Skip to main content

Linux ची तोंडओळख

नमस्कार मित्रांनो,


प्रत्येकाने linux नाव ऐकल आहे. ही एक  Operating System आहे. 
windows XP, windows 7, windows8, आणि MAC OS X सारखी linux पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे.
operating system हे सॉफ्टवेअर आहे जे आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी संबंधित सर्व हार्डवेअर संसाधने व्यवस्थापित करते.
Linux ची निर्मिती  १९९१ मध्ये Linus Torvalds या व्यक्तीने केली.
Operating System हि आपल्या सॉफ्टवेअर आणि आपल्या हार्डवेअर दरम्यान communication  व्यवस्थापित करते. Operating System (OS ) च्या  शिवाय, सॉफ्टवेअर कार्य करणार नाही.
Operating System मध्ये खालील  गोष्टींचा  समावेश असतो :

१. The Bootloader: आपल्या संगणकाच्या बूट प्रक्रियेचे व्यवस्थापन करणारे सॉफ्टवेअर.
२. Kernel: Kernel हा संगणकाच्या प्रणालीचा  एक प्रमुख  भाग आहे . हा संगणकाच्या बऱ्याच प्रक्रिया हाताळतो जसे, CPU, Memory, Processes. Kernel हा  OS चा सगळ्यात खालचा टप्पा आहे.


३.Daemons: Daemons ह्या पार्श्वभूमी सेवा आहेत (background services).
४. Shell: आपल्याला मजकूर इंटरफेसमध्ये टाईप केलेल्या command द्वारे संगणकाला नियंत्रित करण्याची परवानगी देते.
५.  Application:- Linux हि तुम्हाला खूप सारे Application उपयोग करण्यासठी देते. डेस्कटॉप वातावरण अॅप्सचे  पूर्ण नियंत्रण प्रदान करत नाहीत.  Linux मधेही दैनंदिन वापराची applications वापरता येतात. ते app स्टोर वर उपलब्ध  असतात.

आत्ता आपण Linux  आणि Windows मधील फरक जाणून घेऊयात.

NO TOPICS LINUX WINDOWS
1 किंमत मोफत  विकत 
2 निर्माता Linux kernel हा जगभरातील लोकांनी मिळून  विकसित केला आहे.  Linus Torvalds गोष्टी पाहतात. Microsoft
3 विकसक  Linus Torvalds Microsoft
4 वापरकर्ता प्रत्येकजण प्रत्येकजण, ज्याच्याकडे Microsoft OS license आहे.
5 परवाना GNU   जनरल पब्लिक परवाना मालकीचे
6 उपलब्ध भाषा बहुभाषी बहुभाषी
7 File system support Ext2, Ext3, Ext4, Jfs, ReiserFS, Xfs, Btrfs, FAT, FAT32, NTFS FAT, FAT32, NTFS, exFAT
8 Default user interface Gnome or KDE चित्रलेखीय (Graphical)
9 Text mode interface BASH  command shell 
10 OS कुटुंब GNU DOS
11 प्रोग्राम केलेले C Assembly, C, C++
12 स्रोत Model फ्री सॉफ्टवेअर वैयक्तिक, व्यवसाय


Comments